नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अकोला/प्रतिनिधी – अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नामांकन रॅली काढण्यात आली. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले की, आतापर्यंत आपण फक्त बोलत आलेलो आहोत, पण मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आता कृती करायची आहे. पुढील २० दिवस सर्व कामे बाजूला सारून निवडणुकीच्या प्रचारात आपण असले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या बूथ कमिट्या झालेल्या आहेत त्यांनी आपापले बूथ सांभाळले पाहिजे, जो मतदार मत देणारा आहे त्याला बूथ पर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. जो पक्षाचा कार्यक्रम आहे तो सामान्य माणसांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे कार्यकर्ते हे कार्य पार पाडतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या रॅली दरम्यान शहरातील सर्व प्रमुख चौकात ऍड. आंबेडकर यांना वेगवेगळ्या जाती समूहांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.