नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – जिल्ह्यातील नागरी प्रश्न समजून त्याचे खरेखुरे पालकत्व स्वीकारणारे पालक मंत्री जिल्ह्याला लाभल्यास विकास अधिक सकारात्मक पद्धतीने होईल. यासाठी स्थानिक व स्वतंत्र पालक मंत्री जिल्ह्याला प्राप्त होणे गरजेचे आहे.आणि याच मागणीसाठी सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या तशी मागणी केली जात आहे.
सोलापूरचे नवीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाला आता सोलापुरातून विरोध होत आहे.दोन बायका आणि फजिती ऐका याप्रमाणे सोलापूर आणि अमरावतीसाठी असणारे चंद्रकांत पाटील हे दोन जिल्हाचे पालकमंत्री आहेत. त्यांना सोलापूर जिल्हासाठी स्वतंत्र पालकमंत्री द्या अन्यथा नको अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.दुहेरी पाईपलाईन , सोलापूर विमानसेवा, एमआयडीसी, वीज, रस्ते, पाणी हे प्रश्न अद्याप सुटले नाहीत. सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पालकमंत्री देण्यात यावा.या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.