प्रतिनिधी.
कोल्हापूर – कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका,आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणेचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी इचलकरंजीजवळील कोरोची येथे अगदी माफक दरात उत्पादन सुरु केले आहे. टेपिंगसह 90 जीएसएम लॅमिनेटेड आणि 60 जीएसएम 5 लेयर डबलएस डबलएमएस ब्रिदेबल सद्या असे दोन प्रकारचे पीपीई किट तयार केले जात आहेत. याचे कापड सीट्राने तर पूर्ण किट डीआरडीओने प्रमाणित केले आहे.
श्री. घोरपडे यांची युवा क्लोथींग कंपनी श्रीपाद गारमेंट कोरोची येथे आहे. याठिकाणी आठ वर्षांपासून ते उत्तम दर्जाच्या शर्टची निर्मिती करत आहेत. कोव्हिड-19 या विषाणूने जगाबरोबरच आपल्या देशात शिरकाव केला आहे. राज्यामध्ये याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्र मोठी जोखीम घेवून अशा रुग्णांवर उपचार करत आहे. आपल्या जिल्ह्यामध्येही कोव्हिड-19 संशयित आणि बाधित रुग्णांवर डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक आणि सहायक कर्मचारी मोठ्या धाडसाने आणि कर्तव्यनिष्ठेतून उपचार करत आहेत. मात्र या उपचारकर्त्यांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाणाऱ्या पीपीई किटची बाजारामध्ये कमतरता आहे, हे वाचून युवराज घोरपडे यांनी कोरोची येथे संचारबंदीच्या काळात विशेष परवानगी घेवून पीपीई किटची निर्मिती सुरु केली आहे.
यासाठी लागणारे 5 पदरी स्पन स्पन मेल्टब्लोन मेल्टब्लोन स्पन हे 60 जीएसएम नॉन ओव्हन कापड हे तामिळनाडूमधील कोईमब्तूर येथून शासनाच्या निकषाप्रमाणे मागवले आहे. हे कापड मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवून त्याचे प्रमाणिकरण करुन घेतले. त्याचबरोबर कोईमब्तुर येथील सीट्रानेही प्रमाणित केले आहे. सद्या या ठिकाणी जिल्ह्यात प्रथमच टेपिंग करण्याचे मशिन आले आहे. या मशीनव्दारे तयार होणारे टेपिंगसह पीपीई किट दिल्ली येथील डीआरडीओ-आयएनएमएएस कडूनही प्रमाणित झाले आहे.
याविषयी माहिती देताना युवराज घोरपडे म्हणाले, सद्या दोन प्रकारचे पीपीई किट तयार केले जात आहेत. 90 जीएसएम लॅमिनेटेड आणि 60 जीएसएम 5 लेयर डबलएस डबलएमएस ब्रिदेबल आहे. आयसीयु किंवा रेड झोनमध्ये येत नसाल तर हे किट 10 ते 12 वेळा धुवून वापरू शकता. शिलाई करताना सुईमुळे होणाऱ्या छोट्या छिद्रांमधूनही रक्त अथवा कोणत्याही प्रकारचे द्रव्य कण आतमध्ये जाणार नाहीत यासाठी सद्या या किटला टेपिंग मशीनच्या सहाय्याने टेपिंग करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विषाणूचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्हीही आयसीयुमध्ये वापरू शकता. 5 पदरी कापडामुळे वॉटर रेफिलंट क्षमता ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या 3 पदरी किटपेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यावर पाण्याचा शिडकाव केल्यास पलिकडच्या बाजूला पाणी जाणार नाही. जेव्हा एखादा रुग्ण शिंकतो त्या हवेच्या दाबाप्रमाणे जरी पाण्याचा शिडकाव केला तरी देखील ते पाणी शरिरापर्यंत पोहचणार नाही. अशी पूर्ण काळजी घेवून याची निर्मिती केली आहे. अत्यंत माफक किंमतीला आम्ही याची विक्री करत आहोत, असेही ते म्हणाले.
कोरोना बाधित आणि संशयितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे सुरक्षा कवच म्हणजेच पीपीई किट इचलकरंजीजवळील कोरोचीमध्ये तयार होत आहे. तेही पूर्ण दक्षता घेवून अगदी माफक दरात उपलब्ध होत आहे. ही दिलासा देणारी मोठी बाब आहे.

Related Posts
-
समान काम समान वेतनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियान…
-
फळे, फुलांपासून तयार होणारे मद्य आता विदेशी वर्गात
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित…
-
पीपीई किट आता मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा पुढाकार
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी…
-
बाप्पाच्या आगमनासाठी फुलांचे गरुड झेप रथ तयार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या आगमनाच्या…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना जेनेरिक आधारच्या वतीने प्रथमोपचार किट वाटप
मुंबई /प्रतिनिधी - जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे.…
-
केडीएमसीने ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले सुरक्षित सुबक मॉडेल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण…
-
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या केडीएमसी आयुक्त यांच्या सूचना
कल्याण/प्रतिनिधी - अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा…
-
जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक
मुंबई/प्रतिनिधी - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार…
-
हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांतून तयार होणाऱ्या वस्तू आता फ्लिपकार्ट वर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाचे लघु उद्योग महामंडळ तसेच खादी…
-
अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या आरोग्यमंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा…
-
ओबीसी राजकीय आरक्षण, इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती
मुंबई/प्रतिनिधी - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा…
-
नागपूरच्या राजेश जोशींनी तयार केले सर्वात छोटे व हलके विमान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगभरात असे कुठलेच…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार…
-
कल्याण क्राइम ब्रांचची मोठी कारवाई, आडीवली परिसरातील बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर छापा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी परिसरात एका…
-
रेल्वे कडून सिमेन्स इंडिया कंपनीला ९००० एचपी इलेक्ट्रिक मालवाहू इंजिन तयार करण्याचे कंत्राट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेनं सिमेन्स…
-
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अकोला येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाला वंबआ च्या वतीने १०० पीपीई भेट
प्रतिनिधी . अकोला:- दि १० – एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
जानेफळ पॅटर्न, कोरोना लसीकरणात आपला स्वत:चा पॅटर्न तयार करणारे गाव
औरंगाबाद/ प्रतिनिधी - आज कोरोना या आजाराविषयी बरीच चुकीची माहिती…
-
कोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची सुकन्या देतेय योगदान,वर्षभरात सहा युवतींनी मिळून बनवल्या २० लाख कीट
सोलापूर/प्रतिनिधी - देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत…