महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
इतर थोडक्यात

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (१२ मे) काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेशाद्वारे पूर्वसुचना देण्यात आली असून याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

२२ केव्ही दुर्गाडी उपकेंद्रातून निघणाऱ्या आधारवाडी फिडरवरील सोनावणे कॉलेज, वाडेकर सर्कल, साईबाबा मंदिर, अन्नपुर्णा नगर, जेलरोड, सहजानंद चौक फिडरवरील मोहिंदरसिंग काबुलसिंग, ठाणकरपाडा, दुर्गानगर, मानससरोवर, सुंदरनगर, महाराष्ट्र नगर, आग्रा रोड फिडरवरील आग्रा रोड, भारताचार्य चौक, लाल चौकी, पारनाका, नमस्कार मंडळ, बंदर रोड फिडरवरील रेतीबंदर, मिठबंदर, व्हाईट हाऊस, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, कोलीवाडा आदी भागाचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तथापि संबंधित भागाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात इतर वाहिन्यांवरून सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर वाडेघर फिडरवरील आनंदसागर, डीबी चौक, श्री कॉम्लेक्स मेहरनगर, डॉन बॉस्को शाळा, वाडेघर, साई शरण आदी भागाचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×