नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, चांदवड, देवळा, सटाणा, कळवण, मालेगाव, सिन्नर तसेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी नगर वैजापूर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली जाते. या डाळिंबाची विक्रीची सोय व्हावी म्हणून लासलगाव बाजार समिती गेल्या नऊ वर्षांपासून डाळिंबाचे लिलाव होत आहेत.
आज लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाचा शुभारंभ झाला यावेळी शुभारंभ प्रसंगी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील व तालुक्यातील ढवळापुरी गावातील डाळिंब उत्पादक शेतकरी शहा अन्सार यांनी आणलेल्या डाळिंबातील एक कॅरेट 5100 रुपये मिळाला तर आज 300 ते 400 कॅरेटची डाळिंबाची आवक झाली होती. जास्तीजास्त 5100, कमीतकमी 200 रुपये तर सरासरी 2011 रुपये इतका प्रति कॅरेटला बाजार भाव मिळाला आहे. डाळिंब उत्पादकांनी आपल्या डाळिंबाला चांगला बाजार भाव मिळावा यासाठी योग्य प्रतवारी करून 20 किलोच्या कॅरेटमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापतींनी केले आहे.