नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी युवा तरुणा बरोबरच वृद्ध मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यात उत्सवाचे वातावरण बघायला मिळाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल.
अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. अमरावती मध्ये 37 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे व प्रहारचे दिनेश बुब यांच्यात लढत होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, जिल्ह्यात सर्वाधिक 354 मतदान केंद्र मेळघाटात आहेत. यावेळी मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.