नेशन न्यूज मराठी टीम.
हिंगोली/प्रतिनिधी – चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष,” मराठा आरक्षण हाच आमच लक्ष असे बॅनर लावुन सरकारचं लक्ष वेधण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ऐंशीच्यावर गावागावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावांमध्ये येण्यास बंदी असे बॅनर लावले जात आहेत. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेश बंदी घालण्याची मराठा समाजाची तयारी केली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसते आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सुरजखेडा गावात महिलांनी गावात फेरी काढून जो पर्यंत मराठा आरक्षण नाही तो पर्यंत राजकिय पुढाऱ्यांना गावात येण्यासाठी बंदी असे बॅनर लावले आहेत. तर केंद्रा खुर्द ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण गावांच्या वतिने जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत संपूर्ण निवडणुकीवर बहिष्कार असा ठराव पारीत केला आहे. तर गोरेगाव चोंडी बुद्रुक गावांमध्ये सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांसोबतच आमदार, खासदार यांना गावात प्रवेश बंदी असे बॅनर लावण्यात आले आहेत.