नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पेनड्राईव्हची सत्यता तपासण्यात येणार असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगून संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या नियम २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात पोलीसांनी उत्तम कामगिरी केली असून ‘२०२० या वर्षातील गुन्हे’ (Crime in 2020) या अहवालानुसार राज्यात ३ लाख ९४ हजार १७ गुन्हे दाखल झाले असून दर लाख ३१८ गुन्हे आहेत, त्यात महाराष्ट्र देशात अकराव्या क्रमाकांवर असून राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित असल्याचे सांगून कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला. महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले असून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ते विधेयक आता राष्ट्रपतींकडे गेले आहे, त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात एक चांगला कायदा अस्तित्वात येणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींच्या सुधारणा करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ८७ पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेतली असून यावर्षी पोलीसांच्या निवासस्थानांसाठी देखील भरीव तरतूद केली आहे, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले. राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्याची संधी उपलब्ध आहे, त्यासाठी १५ वर्षांची अट होती ती आता १२ वर्षांवर केल्याचे सांगून कोविडकाळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करुन ३९४ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
१३८ विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता
बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत दाखल गुन्ह्यांसाठी १३८ विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, हे सांगतानाच, गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षभरात १२० ते १५० दिवस काम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.
७ हजार २३१ पदांची नवीन पोलीस भरती होणार
पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात यातील पात्र निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका दिल्या जातील असे सांगून येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे, मंत्रीमंडळाने या भरतीला मान्यता दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
पोलीस शिपाई निवृत्तीच्या वेळी पीएसआय होणार
पोलीस सेवेत शिपाई म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास निवृत्त होताना ३० वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून पोलीस शिपायांना आता निवृत्तीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. कोविड काळात शासनाने घातलेल्या नियमांचा भंग केला म्हणून दाखल गुन्हे मागे घेण्याचा तत्वतः निर्णय घेतला असून पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांकडून प्राप्त प्रस्तावांनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.
पेपरफुटीप्रकरणात पोलिसांची कठोर भूमिका
पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून विविध ५ गुन्हे दाखल केले आहेत. आरोग्य विभागाच्या ‘ड’ वर्ग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रक्रणी २० जण अटकेत असून १० जणांना अटक करणे बाकी आहे. आरोग्य विभागाच्याच ‘क’ वर्ग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणी ११ जणांना अटक केली असून ९ जण पोलीसांना हवे आहेत तर म्हाडातील पेपरफुटी प्रकरणी ६ अटकेत आहेत. टीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरु असून १४ जणांना अटक केली आहे, असे सांगून भरती प्रक्रियेसाठी कंपन्या नियुक्त करताना यापुढे पारदर्शक पद्धती राबविण्यावर विविध विभागांना भर द्यावा लागेल, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.
राज्याचे पोलीस दल उत्तम काम करीत असून पोलीस दलाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही देखील शेवटी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली.
Related Posts
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
मद्यपी वाहनचालकाचा प्रताप, वाहतूक पोलीस कार्यलयात घातला धिंगाणा
कल्याण प्रतिनिधी- काल रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती
पदाचे नाव : आशा स्वंयसेविका - ३६० जागा शैक्षणिक पात्रता : किमान…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
डिसेंबरपर्यंत राज्यात ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येणार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
औरंगाबाद/प्रतिनिधी - डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल.…
-
मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेतील सर्वांचे आभार ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांतून ५ लाखांहूनअधिक स्थलांतरित त्यांच्या राज्यात
प्रतिनिधी. मुंबई दि. ३०: परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत…
-
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची…
-
रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७ शैक्षणिक…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती, पोलीस भरतीसाठी सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती
१. पदाचे नाव : आरोग्य निरीक्षक - ५० जागाशैक्षणिक पात्रता…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड…
-
पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठविण्याची मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी . मुंबई दि.१३- राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत…
-
जालना लाठीमार प्रकरण, पोलीस महानिरिक्षक यांनी घेतली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टिम. जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील गृह विभागात लवकरच…
-
९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पोलीस दलातील उल्लेखनीय व…
-
आतापर्यंत २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले…
-
आजाद समाज पार्टीचे कंत्राटी भरती विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राज्य शासनाने…
-
पोलीस शिपाई भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात पोलीस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC)…
-
कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
प्रतिनिधी . मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५०…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
प्राध्यापकांच्या ३ हजार ६४ रिक्त जागांची भरती प्रकिया लवकरच
पुणे/प्रतिनिधी- नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने 21 जून 2021…
-
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच पार पडलेल्या…
-
वंचितची २८० ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता, तर राज्यात तीन हजार ७६९ उमेदवार विजयी
प्रतिनिधी. मुंबई - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन…
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदाची भरती
पिंपरी चिंचवड