नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अशा वेबसिरीजवर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करत आहे, अशी माहिती गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपती यांच्याकडे गेले असून राष्ट्रपती कार्यालयाकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्या माध्यमातून महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असेही मंत्री वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी गृह, सार्वजनिक आरोग्य, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासंबंधित सन 2021-22 या वर्षाच्या पुरवणी मागण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी गृह विभागाच्या चर्चेस उत्तर देतांना गृह मंत्री वळसे पाटील बोलत होते.
वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींबाबत गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमधील देहप्रदर्शन आणि इतर दृश्यांवर बंधने घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रसारण विभागाशी बोलून आक्षेपार्ह वेब सिरीजवर बंदी घालण्याबाबत पाउले उचलली जातील.
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, रौलेट या ऑनलाईन गेम्ससंदर्भात आपल्याकडे अजून सक्षम कायदा नाही. पण कुणी महसूल बुडवून फसवणूक करत असेल तर त्यामध्ये गृहखाते गंभीरपणे लक्ष घालेल.
शक्ती विधेयकाबाबत मंत्री वळसे-पाटील म्हणाले, शक्ती विधेयक आता दोन्ही सभागृहे व राज्यपालांकडून मंजूर होऊन राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी गेले आहे. राष्ट्रपती कार्यालयाशी संपर्क साधून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी विरोध पक्षानेही प्रयत्न करावा, जेणेकरून महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देता येईल. शासकीय नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथियांना तीन टक्के आरक्षण देण्याची मागणी पुढे आली असून, त्यावरही येत्या काळात लक्ष घालू. बलात्कार प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी तरतूदी करण्यात येत आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच राज्यशासन खटले मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तथापि, आंदोलन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करुनच आंदोलन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बहुतेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील पोलिस स्थानकांच्या इमारती आणि पोलिसांच्या निवासस्थानांसंबंधी काही मागण्या यावेळी केल्या होत्या. त्यावर मार्च पूर्वी ८७ इमारतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. येणाऱ्या काळात आणखी निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. २०२१-२२ मध्ये ७२९ कोटींच्या निधीची मागणी होती, त्यातील ३६४ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. अर्थ विभागाकडून उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना चांगली वाहने देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
सीसीटीव्ही सुरक्षेच्या प्रश्नावर गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले की, सीसीटीव्ही संदर्भात न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. सर्व पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात न्यायालयाचा आग्रह आहे. सीसीटीव्ही बसवताना तंत्रज्ञान निवडण्यात वेळ जात आहे. त्यावर राज्य सरकार प्राथमिकता ठरवून लवकरच सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण करेल. नगर विकास, ग्राम विकास आणि गृह विभागाच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविण्याचे काम करू. गडचिरोली येथे सी 60 दलातील जवान लढाईचे काम करतात, त्यांच्या जीवाला नेहमी धोका असतो. त्यामुळे त्यांना इतर पोलिसांपेक्षा अधिकचा भत्ता वाढवून देण्याची मागणी होत आहे.
रावेर येथील शेतीच्या भागात होणाऱ्या चोऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी अधिकची पोलिसांची कुमक उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचेही असेही श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
Related Posts
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जालना येथे लाठी चार्ज…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
केडीएमसीची अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
दूध भेसळ प्रकरणी, भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्हाधिकारी…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई
भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची ग्रामस्थाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
कल्याण आरटीओ परिसरातील अनधिकृत टपर्यांवर पालिकेची धडक कारवाई
नेशन न्युज मराठी टीम.कल्याण - कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी…
-
तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन, टिसीएसवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - तलाठी परिक्षा…
-
कल्याण ग्रामीण खोणी गावातील ५५ वीजचोरांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीजचोरी शोध मोहिमेवरील…
-
येरवडा मध्यवर्ती कारागृहास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
पुणे/प्रतिनिधी- महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वाडा/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात…
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
डोंबिवलीत नवीन रेल्वे मार्गासाठी बाधित घरे तोडण्याची कारवाई सुरू
डोंबिवली/प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणारी…
-
‘डीप फेक’ व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांची ४९३ वाहन चालकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहर वाहतूक उपशाखा कल्याण…
-
खबरदार,अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास पालकांवर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. https://youtu.be/4Zz0_JYF0tc डोंबिवली - १८ वर्षाखालील मुलांना…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई
WWW.nationnewsmarathi.com कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात ७९ वीज चोरांविरुद्ध जानेवारी…
-
भेसळयुक्त दुध व खव्याच्या साठ्यावर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - दुध व…
-
उल्हासनगरच्या अशोका बारकडून वीजचोरी प्रकरणी महावितरण पथकाची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - उल्हासनगर एक…
-
प्लॅस्टिक विरोधात कंपनीवर कारवाई,२.५ टन प्लास्टिक जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या…
-
सीगल पक्ष्यांना शेव गाठी खायला दिल्यास होणार कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वनपरिक्षेत्र कार्यालय कल्याण व…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
अखेर कल्याण स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीसांची कारवाई
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना…
-
कल्याणात सिग्नल मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई, २६ जानेवारी अंमलबजावणी
प्रतिनिधी. कल्याण - गेल्या काही महिन्यांपासून कल्याणात प्रायोगिक तत्वावर सुरू…
-
आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये - राज ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - करोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे…