नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी– नेहमीच अवैध सवकरांकडून कर्जदारांची आर्थिक पिळवणून होताना आपल्याला दिसून येत आहे. असेच काही चित्र रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत सावकार सध्या कर्जदारांना मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत कर्जदाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसुल करुन त्यांची पिळवणूक करीत आहेत. कर्जाच्या व्याज वसूलीसाठी तगादा लावून त्रास दिला जातोय.
सवकरांकडून पिळवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी सध्या रत्नागिरी पोलीसांत दाखल झाल्यात .एक लाखाच्या कर्जाची रक्कम ही 40 लाखांच्या घरात पोहोचली.याप्रकरणी पोलीसानी गुन्हे दाखल करत आरोपींना देखील अटक केलीय.त्याचबरोबर जिल्ह्यातील 68 सावकारांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस देखील बजावलीय त्यामुळे या सावकारांची आता कसून तपासणी होणार आहे.अशी माहिती रत्नागिरी पोलिस अधीक्षक यांनी दिली आहे .