नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – दिंडोशी हद्दीतील सुभाष लेन येथे वैष्णोदेवी मंदीरात चोरट्यांनी 800 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. यात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते दोन्ही आरोपी यूपीचे असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे त्यांनी ही चोरी केली होती, असे डीसीपी स्मिता पाटील यांनी सांगितले.
त्यातला एक आरोपी हा दहिसर मध्ये डायमंड मार्केट मध्ये काम करत असून दुसरा हा गावी मजुरी करायचा. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहे. अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली.