महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – आतापर्यंत तुम्ही चोरी,लूटमार या सारख्या अनेक गुन्हेगारीच्या घटना ऐकल्या असतील पण कल्याणात काही युवक चक्क घरगुती सिलिंडरमधील गॅसची चोरी करत होते. पण सिलेंडर विकत घेणाऱ्या नागरिकांना थोडा देखील संशय आला नाही.

डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका भागात भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलेंडरमधील दोन किलो गॅस काढून तो वाणीज्य सिलिंडरमध्ये भरायचा आणि मग घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना कमी वजनाचा देऊन वाणीज्य गॅस सिलिंडरच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे काम कित्येक दिवसापासून तीन युवक करत होते. नागरिकांना लुबाडण्याचे काम हे युवक करत होते. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला आणि त्रिकुटाला अटक केले. सुजय कदम 30, पप्पू मिश्रा 32, उत्तम बनकर 55 अशी आरोपींची नाव आहेत. तिन्हीही आरोपी कल्याणातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी आरोपी टोळीकडून 44 सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच एकून साडेचार लाखाहून अधीक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या मते या प्रकरणाची अजून सखोल चौकशी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×