नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतील कांदिवली पोलिसांनी रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ती कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयातून २० दिवसांचे बाळ चोरून पळून गेली होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि बाळाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती. महिलेकडे चौकशी केली असता, महिलेचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र तिला मूल होत नव्हते, त्यामुळे ती नाराज होती आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती.
पोलिसांनी पुढे सांगितले की, ही महिला प्रथम शताब्दी रुग्णालयात गेली आणि तेथे तिने मुलाच्या आईशी याविषयी बोलले. विश्वासात आल्यानंतर आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवले आणि ती मुला घेऊन पळून गेली. कोम्बिग ऑपरेशन द्वारे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. तर या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होत आहे.
दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे.