नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – आंबिवली येथील इराणी वस्तीत परत एकदा पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलिस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेऊन गेले. मात्र यासाठी त्यांना जीव धोक्यात टाकावा लागला. या वस्तीत गेल्या २० वर्षापासून अशा प्रकारे पोलिसांवर हल्ले सुरु आहेत. इराणी वस्तीतील लोक चोरी सोडत नाही. आणि हिंमत इतकी की त्यांना पोलिसांनी थोडीही भिती नाही. यांची दहशत कधी थांबणार.अशी बोलले जात आहे .
मुंबईतील येथील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी फसविले होते. १० ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. डीएननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही चेक केला. त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो. पोलिसांना त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. वस्तीत आधी एक महिला आली. ती महिला बुरखा घालून आली होती. ती पोलिस होती. तिच्यासोबत देखील काही पोलीस होते. फिरोज कुठे दिसतोय का हे शोध सुरू होता. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. या पोलिसाने वस्ती बाहेर थांबलेलया पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पोलीस जीप न वापरता. एक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हेन घेऊन आले. आरोपीला पकडले. या दरम्यान आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस व त्यांच्यात झटापट झाली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. फिरोज याच्या विरोधात ३५ गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान वारंवार पोलिसात कोणारा संघर्ष कधी थांबणार आणि इराणी आरोपींना जरप कधी बसणार.गेल्या २० वर्षापासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस जातात. तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो. एकदा तर पोलिसांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. २००८ साली अशाच एका घटनेत पोलिसांना बचावासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोन इराणींचा मृत्यू झाला होता. अखेर इराणी वस्तीतील चोरट्यांची दहशत कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे.