प्रतिनिधी.
अमरावती – कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. अमरावतीत ही सुविधा उपलब्ध झाल्याने उपचारांना गती मिळेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. या अनुषंगाने प्लाझ्मा बँकही निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. अमरावती जिल्हा रूग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा शुभारंभ आज पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. आशिष वाघमारे, डॉ. अमित क्षार, तंत्रज्ञ सचिन काकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह डॉक्टर, पारिचारिका आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण होऊन अहवाल मिळण्याच्या प्रक्रियेला गती आल्यानंतर आता प्लाझ्मा थेरपी यंत्रणाही उपलब्ध झाली आहे. उपचाराच्या अनुषंगाने अद्ययावत यंत्रणा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. महाविकास आघाडी शासनाने जगातली ही सर्वात मोठी सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली आहे. आज ही सुविधा अमरावतीतही सुरु होत आहे, हा अभिमानास्पद क्षण आहे. कोरोनाच्या संकटाशी आपण सर्व मिळून आपण विविध प्रयत्नांतून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या उपचारांत कोरोनावर लक्षणांनुसार विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी रुग्णाला मिळणार आहेत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर ज्याप्रमाणे रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात व रक्तदानाने रुग्णांचा जीव वाचवतात. त्याचप्रमाणे, ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करता येते. आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबून रूग्णांना चांगली सेवा देत आहे. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारीही आपणास पार पाडावी लागेल, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णालयातील रॅपिड टेस्ट यंत्रणा व जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक 10 ला भेट देऊन तेथील सुविधांचीही पाहणी केली.
प्लाझ्मा थेरपीविषयी राज्यात विविध वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही सुविधा देण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.
Related Posts
-
कोवीडच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी उपयोगी नाही, आयसीएमआरच्या नविन गाईडलाईन
कल्याण/प्रतिनिधी - इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) आणि महाराष्ट्र…
-
भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिवंडी/ प्रतिनिधी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत…
-
कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी तब्बल…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
आदिवासींची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
अमरावती मध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जागतिक एड्स दिन साजरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दि.१ डिसेंबर २०२३ रोजी…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
अमरावती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन
अमरावती प्रतिनिधी- कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार दर…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
- एचएससी बोर्डाच्या निकालात यंदा अमरावती विभाग सहाव्या क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीची धामधूम…
-
अमरावती पेपरफुटी प्रकरण, सरकार विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - 21 फेब्रुवारी रोजी…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
अकोला - हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - अकोला पॅटर्नने दिला सेना…
-
अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर
अकोला/ प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
पत्रकाराने केले दोनदा प्लाझ्मा दान, कोरोनाग्रस्तांना मिळाले जीवदान
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या…
-
अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
प्लाझ्मा, रक्तदात्यांसह, पोलिस, अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी. मुंबई - देशात कोरोनाच्या केसेस एकावेळी दरदिवशी ९४,००० मिळत…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…