कल्याण/प्रतिनिधी – इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) आणि महाराष्ट्र शासनाने प्लाझ्माबाबत नविन गाईडलाईन्स जारी केल्या असून कोवीड झालेल्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी उपयोगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामूळे खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांनी मध्यम गंभीर किंवा अति गंभीर स्वरूपाच्या कोवीड रुग्णासाठी प्लाझ्मा आणण्यासाठी पाठवू नका असा महत्वपूर्ण सल्ला इंडियन मेडीकल असोसिएशनचे कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजारावर आणि उपचार पद्धतीवर सगळीकडेच अभ्यास – संशोधन सुरू आहे. आपल्याकडेही आयसीएमआरकडून याबाबत सतत अभ्यास सुरू असून त्यानूसार हे नविन निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोवीड पेशंटवर प्लाझ्मा थेरपी कधी करावी हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. अभ्यासाप्रमाणे पेशंट कोवीड पॉझिटिव्ह झाल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसांत प्लाझ्मा देणे आवश्यक असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. तसेच सुरुवातीला रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडी नसल्याने या प्लाझ्माची कोवीडशी लढण्यास मोठी मदत होते. परंतु आपल्याकडे कोवीड पेशंट गंभीर झाल्यावर प्लाझ्मा थेरपी वापरली जात असली तरी गंभीर रुग्णाला ती अजिबात फायदेशीर नसल्याचे आयसीएमआरच्या अभ्यासात समोर आल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. त्यामूळे ही प्लाझ्मा थेरपी मध्यम गंभीर किंवा अति गंभीर स्वरूपाच्या पेशंटवर न वापरण्याचा सल्लाही आयसीएमआरने दिला आहे.
परदेशात प्लाझ्मा थेरपी वापरत नाहीत…
आपल्याकडे कोवीड रुग्णासाठी प्लाझ्मा थेरपी ही सुरुवातीच्या काळात उपयुक्त असून अमेरिका इंग्लंडमध्ये मात्र या थेरपीचा वापर केला जात नाही. अमेरिकेत मोनोक्लोनल अँटीबॉडीजची उपचार पद्धती वापरत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची हलक्या स्वरूपाची लक्षणे असल्यास त्याला उपचार केंद्रावर बोलावले जाते आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजची बॅग सलाईनप्रमाणे चढवली जाते. त्यानंतर पुढील 2 ते 3 तास निरीक्षण करून मग घरी सोडले जाते. तिकडे अशाप्रकारे सुमारे 70 ते 80 टक्के रुग्णांवर असे उपचार केले जातात. तर जो बरा होत नाही त्यावर रुग्णालयात दाखल करून इतर उपचार केले जात असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आपल्याकडे असणारी मोठी लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्याही अधिक आहे. त्यामूळे सुरुवातीच्या काळात कोवीड रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देता येईल अशी यंत्रणाही आपल्याकडे सध्या अस्तित्वात नसल्याचे सांगत आपल्याकडे सुमारे 80 टक्के लोकं नॉर्मल कोवीड औषधांनी बरे होत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
अशी काम करते प्लाझ्मा उपचार पद्धती…
कोवीड इन्फेक्शनशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. हा व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यावर या अँटिबॉडी काढून दुसऱ्या कोवीड रुग्णाला दिल्या जातात. ज्या त्याच्या शरीरात जाऊन कोवीडशी लढण्यासाठी मदत करतात. पण सुरुवातीच्या काळातच या अँटिबॉडी देऊन फायदा असल्याचा पुनरुच्चार डॉ. पाटील यांनी यावेळी केला. पहिल्या 4 दिवसांत या अँटिबॉडी देणे फायदेशीर असून त्यानंतर प्रत्येक कोवीड रुग्णामध्ये त्या तयार होण्यास सुरुवात होते. शरिरात असणाऱ्या कोवीड विषाणूची वाढ 9 ते 10 दिवसांनी आपोआप थांबते. मात्र त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या फुफ्फुसात झालेल्या नुकसानामुळे तो झगडत असतो. पोस्ट कोवीड आजारांसाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
रुग्णालय आणि डॉक्टरांना कळकळीची विनंती…
जे कोवीड रुग्ण आयसीयू किंवा आयसीसीयुमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा काहीही रोल नाहीये. त्यामूळे अशा रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्यासाठी धावपळ करण्यास अजिबात सांगू नका अशी कळकळीची विनंती यावेळी डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी केली. आयसीएमआर आणि महाराष्ट्र शासन कोवीड उपचारात कोणताही रोल नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्यासाठी पाठवू नका असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
Related Posts
-
ठाकुर्लीत हॉटेलमधील कुकरचा स्फोटात ग्राहक गंभीर जखमी
प्रतिनिधी. डोंबिवली - ठाकुर्ली पूर्वेकडील स्टेशनजवळील सौभाग्य न्यू किचन या…
-
केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील…
-
यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
नागपूर/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या…
-
कल्याणातील वस्तीगृहात छताचा भाग कोसळल्याने वॉर्डनला गंभीर दुखापत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणमधील शासकीय वस्तीगृहात…
-
भविष्यात लोकशाही टिकणार की नाही ? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार…
-
लळींग घाटात गॅस टँकरला ट्रॉलाची धडक, चालक गंभीर
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी -मुंबई - आग्रा महामार्गावरील लळींग…
-
'साहेब मी गद्दार नाही' अखेर तो बॅनर हटवला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते-आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/FuFHDHUCk5Q?si=NgJjY0O1WYMdoIdA अहमदनगर/प्रतिनिधी - शिर्डी लोकसभा…
-
पत्रकाराने केले दोनदा प्लाझ्मा दान, कोरोनाग्रस्तांना मिळाले जीवदान
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार…
-
केडीएमसीच्या ७ मजली वाहनतळाला मार्गीकाच नाही
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनतळासाठी…
-
मद्यधुंद एसटी चालकाने दिली महिलेला धडक, महिला गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बस चालकाने दारूच्या…
-
मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही - उपमहापौर जगदीश गायकवाड
डोंबिवली/प्रतिनिधी - नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले…
-
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
नालासोपारा/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक…
-
महाविकास आघाडीतच समझोता नाही! -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच…
-
२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सध्या देशभर…
-
४०० पार होणार नाही ही फक्त नौटंकी आहे-नितेश कराळे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - आपल्या विनोदी स्वभावशैली…
-
प्लाझ्मा, रक्तदात्यांसह, पोलिस, अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी. मुंबई - देशात कोरोनाच्या केसेस एकावेळी दरदिवशी ९४,००० मिळत…
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या…
-
कल्याण मध्ये कोवीड प्लाझ्मा ड्राईव्ह उपक्रम,डोनर्सना नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी 'प्लाझ्मा' महत्वाची भूमिका…
-
या दोन गावात एकही गावकरी गणपती घरी आणत नाही
कल्याण ग्रामीण - राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा…
-
महायुती सरकार हे भांडवलदारांचे असुन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही-बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील विकासाची पंढरी…
-
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लहान मुलांच्या तिकीट नियमात कोणताही बदल नाही
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या…
-
चार चार महीने पगार नाही, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या विभागीय…
-
मोठी ऑफर आली तरी मी तिला हुरळून जाणार नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. परभणी/प्रतिनिधी -सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे…
-
राहुड घाटात एकाच वेळी दोन अपघात, पुरुष व महिलांना गंभीर दुखापत
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - चांदवड आग्रा…
-
५६ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला वॉण्टेड अब्दुल इराणी पोलिसांच्या जाळ्यात
कल्याण/प्रतिनिधी- वसई पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटाळीतील हैदर…
-
राज ठाकरे यांचा युतीला कुठलाही फायदा होणार नाही- रामदास आठवले
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि…
-
राज ठाकरे यांची आम्हाला आजिबात आवश्यकता नाही - रामदास आठवले
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/Sv3boOiTWmc शिर्डी/प्रतिनिधी - राज ठाकरे यांचे…
-
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्यात देणार,कुणाच्याही वेतनात कपात नाही.
प्रतिनिधी. मुंबई- कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी…
-
यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाचा एकही मूडदा पडू देणार नाही- जरांगे पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/E1qOJXTgLO8?si=IvhCW9zyXkM1L9OG जालना / प्रतिनिधी - जालना…
-
कल्याणच्या अत्रेरंगमंदिरात वॅक्सीनसाठी रात्री पासून रांगा लावून कुपन मिळाले नाही,नागरिक आक्रमक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून कल्याणच्या अत्रेरंगमंदिर आणि…
-
करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही- पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे – ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची…
-
देश चंद्रावर जरी पोहचलेला, तरी लोकांची मनुवादी मानसिकता बदलत नाही - महेश तपासे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - उत्तर प्रदेशच्या…
-
डॉक्टरांनी प्रोटोकॉलचे पालन केल्यास रेमडीसीवीरचा तुटवडा होणार नाही -जगन्नाथ शिंदे
कल्याण प्रतिनिधी - सध्या ठाणे जिल्ह्यासह मुंबईत रेमडीसीविर इंजेक्शनचा मोठा…
-
मोदींच्या सभेत सन्मानाचे स्थान नाही, कल्याणच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/BsEb87EA4lg?si=i3xI9pXFB0WBNdeM कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
सरकार जास्त दिवस टिकणार नाही बोलणाऱ्या भाजपवर मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पलटवार
बीड/ प्रतिनिधी - बीड च्या दौऱ्यावर ओबीचीचे नेते मंत्री विजय…
-
यशोमती ठाकूर यांची नोटीस मिळाली नाही,नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर देऊ - रवी राणा
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - विदर्भात सुरु…
-
नुसती रस्त्याची कामे काढणे म्हणजे विकास नाही - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील खराब रस्ते…
-
बॅग,मोबाईल ठेवण्यासाठी जागा नाही, कामगारांनी मतदान न करने केले पसंत
NATION NEWS MARATHI ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील…
-
दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज़ मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी - दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी…
-
नौटंकी करून वोट मिळणार नाही,रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…