जळगाव/प्रतिनिधी – तापते ऊन आणि वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे हवामान सतत बदलत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीला घाबरून न जाता आपल्या पिकांचे यापासून संरक्षण कसे होईल? यासाठी शेतकरी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उन्हापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी एक शक्कल लढवली आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमाणाचा पारा वाढत चालला आहे. चोपडा तालुक्यात केळी बरोबर पपईची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या फळबागांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी काही शेतकरी क्रॅाप कव्हर लावतात तर काही जण सन ट्री ची लागवड करतात. चोपडा तालुक्यातील एका शेतकऱ्याने पपईच्या पिकांचा बचाव करण्यासाठी शेतात सन ट्री ची लागवड केली आहे. जून महिन्यात हे सन ट्री कापले जाईल आणि त्यापासून शेतात खत देखील तयार होईल असे पपई उत्पादक प्रमोद पाटील यांनी सांगितले. क्रॉप कव्हर ला खर्च येतो परंतु सन ट्री ला खर्च कमी येतो अशी माहिती त्यांनी दिली.