Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी पर्यावरण

पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण

नेशन न्यूज मराठी टीम.

दौंड/ प्रतिनिधी– मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी व नदी काठच्या परिसरात २००० हजार देशी झाडांची लागवड आॅल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विशेष सहकार्याने व द फाॅरवर्ड फाउंडेशन बेंगलोर आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी वड,पिंपळ,उंबर,चिंच, कडुनिंब,करंज, तसेच फळझाडे, औषधी झाडे,व फुलझाडे यांसारख्या झाडांची मिरवडी स्मशानभूमी,नदी काठी व आजूबाजूच्या परिसरात लागवड करण्यात आली आहे.

आपणही या निसर्गाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून मिरवडीतील या दोन कंपन्या एकञ आल्या आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.विशेष म्हणजे वड,पिंपळ,आंबा,अशा अस्सल देशी झाडांची निवड वृक्षरोपणासाठी करण्यात आली.यामुळे आता मिरवडी स्मशानभूमी व नदी किनारी हिरवळीचे जंगल बहरणार आहे.यावेळी द आॅल स्टेट कंपनीचे शंभर कर्मचारी अधिकारी,
शाळकरी मुले, शिक्षक,ग्रामस्थ व इतर वृक्षप्रेमी यांनी उपस्थित राहून श्रमदान केले.निश्चितच या वृक्षलागवड मुळे परिसराच्या वैभवात खूप मोठी भर पडणार आहे आणि ग्रामपंचायत व गावाला उत्पन्नाचे हक्काचे साधन होणार आहे. आत्तापर्यंत गावात ९००० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.यावेळी आॅल स्टेट कंपनीचे संचालक तनय रावत,सर्व सहकारी व फाॅरवर्ड फाऊंडेशन चे समन्वयक सर्व अधिकारी वर्ग व मार्केट कमिटी संचालक तसेच मिरवडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी,कृषी अधिकारी आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X