कल्याण/प्रतिनिधी – भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला ‘Oneness-Vann’ (वननेस-वन) नामक या परियोजनेचा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते २१ ऑगस्ट रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील २२ राज्यांच्या २८० शहरांमध्ये निवडक ३५० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० रोपांची लागवड करण्यात आली. येत्या काळात या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या महाअभियानाअंतर्गत संत निरंकारी मिशनच्या सेवादार व भाविक-भक्तगणांची महत्वपूर्ण भूमिका असेल. या मोहिमेमध्ये संत निरंकारी मिशन व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, शैक्षणिक संस्था व आर.डब्ल्यू.ए. इत्यादीमधील लोकही सहभागी होतील.
या अभियाना अंतर्गत मिशनच्या डोंबिवली झोनमध्ये दोन ठिकाणी वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले ज्यामध्ये डोंबिवली पश्चिम येथील रामदास पुंडलिक पाटील उद्यान कल्याण पश्चिम येथील उंबर्डे या ठिकाणांचा समावेश आहे. मंडळाच्या डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे आणि कल्याणचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल स्वयंसेवकांनी या अभियानामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. याप्रसंगी डोंबिवली येथे स्थानिक नगरसेविका संगीता पाटील, समाजसेवक मुकेश पाटील, पोलीस पाटील भगवान ठाकूर आणि कल्याण महापालिकेचे मुख्य सचिव तथा उद्यान निरीक्षक संजय जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर आदि मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. या व्यतिरिक्त मुंबई शहरात तीन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले ज्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे यार्डमध्ये १५२० चौ.फू. जागेवर ५०० रोपे लावण्यात आली आहेत. तसेच मरोळ पोलीस परेड मैदान आणि गावदेवी मैदान, घाटला व्हीलेज, चेंबूर येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
या अभियानाचा प्रारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, “प्राणवायु, जो आम्हाला या वृक्षांपासून प्राप्त होत असतो त्याचे धरतीवर संतुलन ठेवण्यासाठी वनांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेवढे अधिक वृक्ष लावू तेवढीच अधिक ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि तेवढीच शुद्ध हवाही प्राप्त होईल. ज्याप्रमाणे वननेस-वन चे स्वरूप अनेकतेत एकतेचे दृश्य प्रस्तुत करते तद्वत मानवानेही समस्त विसरुन शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने एकोप्याने राहून जगाचे सौंदर्य वाढवण्याची गरज आहे. माता सुदीक्षाजी यांनी World Senior Citizen’s Day चा उल्लेख करुन सांगितले की ‘वृक्षांची छाया, वृद्धांची माया’ या उक्तीप्रमाणे जसे ज्येष्ठाचे आशीर्वाद आमच्यासाठी आवश्यक आहेत तद्वत वृक्षदेखील आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. वननेस-वन नामक या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांचे समूह (Tree Clusters) लावण्यात येतील. त्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रभावाने आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचू शकेल आणि स्थानिक तापमान सुद्धा नियंत्रणात राहील. हे वृक्ष स्थानिक जलीवायु आणि भौगोलिक परिस्थितीनुसारच लावण्यात येणार आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.
Related Posts
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक…
-
संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/प्रतिनिधी - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
भक्तिभावपूर्ण वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. हरियाणा/प्रतिनिधी - ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण…
-
संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथे ३२४ वृक्षांची लागवड
कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झाली रोमहर्षक सेवादल रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते…
-
भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी
कल्याण प्रतिनिधी- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७…
-
निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा/प्रतिनिधी - १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या…
-
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रसारासाठी राज्यभर फिरणार संदेशरथ,मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी. अमरावती - अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी…
-
जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देणाऱ्या निरंकारी संत समागमाची यशस्वीपणे सांगता
मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
निरंकारी भक्तांकडून कल्याणमध्ये 235 युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - संत निरंकारी…
-
वन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - वनविभाग कर्मचाऱ्यांच्या…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
आंबिवली टेकडीवर केडीएमसी आयुक्तांच्याहस्ते वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी…
-
निरंकारी भक्तांनी केले भायखळा स्टेशन चकाचक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - अलिकडेच यूनेस्कोकडून आशिया पॅसिफिक वैश्विक सांस्कृतिक…
-
मुसळधार पावसातही निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी -मुसळधार पाऊस पडत असूनही आपले…
-
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी…
-
केडीएमसीच्या वर्धापन दिना निमित्त सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष,…
-
भर पावसात मानवसेवेचे ब्रीद जपत ११२ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम…
-
निरंकारी सद्गुरुंनी विरार नगरीत दिला एकत्वाचा दिव्य संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. विरार/प्रतिनिधी - ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते…
-
अडीच महिन्यांपासून सुरू असलेले वन मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही कायम
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वनमजुरांचे कष्टाचे…
-
श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक…
-
पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/ प्रतिनिधी- मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी…
-
शहादा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी…
-
महाराष्ट्रात इफको नॅनो युरियाचा वितरणाचा शुभारंभ
मालेगाव/प्रतिनिधी - सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून…
-
संत तुकाराम साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष…