मुंबई/प्रतिनिधी – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT) एक आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये फोटोग्राफी स्पर्धा, हेरिटेज वॉक, फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि कथाकथन यावर आधारित ऑनलाईन कार्यशाळा असतील, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने ११ ऑगस्ट २०२१ पासून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर #MaharashtraThroughMyLens ही फोटोग्राफी स्पर्धा जाहीर केली आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटनाशी निगडीत कुठलाही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबूक वॉलवर #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह तसेच महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत हँडलला (www.facebook.com/maharashtratourismofficial आणि www.instagram.com/maharashtratourismofficial) टॅग करून या स्पर्धेत प्रवेश नोंदवू शकता. फोटो अपलोड करताना तो वन्यजीव, लँडस्केप, साहस, निसर्ग, ग्रामीण आणि शहरी जीवन, वारसा, संस्कृती, खाद्य इत्यादी पुरताच मर्यादित असावा असे नाही. यामध्ये आपण आपली कल्पकता वापरू शकता, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.
स्पर्धकाच्या फोटोग्राफीची अभिनव शैली, फ्रेमिंग, कॉम्पोझिशन, एडिटिंग स्किल्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद हे निकष विचारात घेऊन विजेत्यांची निवड केली जाईल. 19 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केले जातील. प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे दिली जातील. त्याचबरोबर इतर निवड झालेल्या 20 स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील हेरीटेज वॉक असेल. यामध्ये वरिष्ठ छायाचित्रकारासोबत उत्साही २० छायाचित्रकारांना हेरीटेज वॉकची संधी मिळेल. हा हेरिटेज वॉक 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत असेल. हेरीटेज वॉकच्या माध्यमातून विविध वारसा इमारतींना भेट देण्याची आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छायाचित्रे टिपण्याची संधी मिळेल. ही छायाचित्रे #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतील. जागतिक छायाचित्रण दिनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाराष्ट्र पर्यटनच्या इन्स्टाग्राम हँडलवर (www.instagram.com/maharashtratourismofficial) ऑनलाईन कार्यशाळा होईल. कार्यशाळेत त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर आधारित मार्गदर्शन केले जाईल. या इंस्टाग्राम ऑनलाइन कार्यशाळा प्रत्येकी ३० मिनिटांच्या असतील.
यासंदर्भात पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह म्हणाल्या की, पर्यटनातील प्रत्येक नवीन उपक्रमासह आम्ही लोकांच्या जवळ जात आहोत. आम्ही यापूर्वी फोटोग्राफी स्पर्धा घेतल्या आहेत. परंतु यावेळची थीम थोडी वेगळी आहे. यामध्ये कुठलीही विशिष्ट थीम न घेता, कल्पकतेला वाव देत, तुमच्या मनातील महाराष्ट्र टिपायचा आहे. यानिमित्ताने स्वतःच्या नजरेतून वेगळा महाराष्ट्र टिपलेल्या नवोदित छायाचित्रकारांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. मुंबई तिच्या धावपळीच्या आणि रात्रीच्या जीवनासाठी ओळखली जाते. त्यात भर घालत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने हेरिटेज वॉकसारखे उपक्रम सुरू करून हेरिटेजच्या पैलूलासुद्धा महत्त्व देत आहोत. मुंबईमध्ये अनेक वारसास्थळे आहेत, हेरिटेज वॉकद्वारे या स्थळांना भेट दिली जाईल. अशा उपक्रमांमधून महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले की, छायाचित्रण हे पूर्वीसारखे अवघड न राहता आता सोपे झाले असले तरी त्यातील बारकावे, कौशल्ये, प्रकाशयोजना, फोटोग्राफीची व्हिजन इत्यादी गोष्टी योग्य मार्गदर्शनाने साध्य करता येऊ शकतील. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने होत असलेले फोटोग्राफीचे विविध उपक्रम हे नवोदित छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. यानिमित्ताने आयोजित होणारे विविध उपक्रम हे ज्ञान प्रदान करतीलच, पण त्याचसोबत फोटो काढताना विचारात घेतल्या जाणाऱ्या कोन, प्रकाशयोजन इत्यादी विविध पैलूंचा दृष्टीकोनही प्रदान करतील. शिवाय यानिमित्ताने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे नव्याने जगासमोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Related Posts
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपिस्टचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आज…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - जागतिक वन्यजीव दिनानिमित्त डोंबिवलीजवळच्या…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडी चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे…
-
केडीएमसीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर फोटोग्राफी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दि.०५ जूनच्या जागतिक पर्यावरण…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या वतीने ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय स्पर्धा आयोग…
-
औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना
प्रतिनिधी. मुंबई - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
प्रतिनिधी. मुंबई- दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
कोल्हापुरात म्हशी पळवण्याची अनोखी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कोल्हापुर/प्रतिनिधी - हलगीचा कडकडाट… घुंगराचा…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
डोंबिवलीत रंगल्या दिव्यांगाच्या जलतरण स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सातारच्या सुकन्येने पटकाविले सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा…
-
जीवनदीप महाविद्यालयात रानभाज्यांच्या पंगतीतून पाककृती स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची…
-
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे…
-
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांची दीक्षाभूमीवर तुफान गर्दी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - बौद्ध धम्म क्रांतीच्या ६७…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज
मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच…
-
जागतिक कराटे स्पर्धेत कल्याण डोंबिवली टिटवाळ्याच्या खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - १० वे १५ जुलै दरम्यान…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
बचतगटांवर कथा यशस्वीनींच्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या…
-
महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी,महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…
-
केडीएमसी शाळेतील विदयार्थ्यांनी घेतला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…