नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – जागतिक वन्यजीव दिनानिमित्त डोंबिवलीजवळच्या पलावामध्ये पॉजचे ट्रस्टी राज मारू आणि वन्यजीव बचावकर्ते ऋषिकेश सुरसे यांनी वन्यजीव छायाचित्रण विशेषत: सरपटणाऱ्या प्राण्यांवर दुसरे प्रदर्शन भरविण्यात आले. पॉज आणि रोटरी क्लब जागृती कार्यक्रमात दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ झाला. प्रदर्शनात सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, फुले, कीटक आणि फुलपाखरांच्या 250 हून अधिक प्रतिमा ठेवण्यात आल्याची माहिती पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.
या प्रदर्शनात ठेवलेली छायाचित्रे संपूर्ण भारतभर फिरून महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांनी क्लिक केली आहेत. यावर्षी पॉजने ठाणे जिल्ह्यातील वन्यजीवांसाठी खास रुग्णवाहिका सुरू केली. ही रुग्णवाहिका ऑस्ट्रेलियन फिलिप वुलन यांनी गिफ्ट केली आहे. यामध्ये विविध वन्यजीव वाचवण्यासाठी साधने आहेत. या वर्षी पॉजने 77 पक्षी आणि 137 सर्प वाचवले आहेत.
जागतिक वन्यजीव दिन (WWD) 2022 मध्ये परिस्थिती प्रणाली पुनर्संचयित करण्यासाठी मुख्य प्रजाती पुनर्प्राप्त करणे या थीम अंतर्गत साजरा केला जाईल. हे उत्सव वन्य जीवजंतू आणि वनस्पतींच्या काही अत्यंत धोकादायक प्रजातींच्या संवर्धन स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या संवर्धनासाठी उपायांची कल्पना आणि अंमलबजावणी करण्याच्या दिशेने चर्चा घडवून आणतील. तर जागतिक वन्यजीव दिनानिमित्त, रोटरी क्लब बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने पॉजच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पश्चिमेतील हेंद्रे पाड्यात वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले. हे प्रदर्शन 8 मार्चपर्यंत चालणार आहे.
20 डिसेंबर 2013 रोजी आपल्या 68 व्या अधिवेशनात संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 3 मार्च 1973 रोजी वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारावर स्वाक्षरी करण्याचा दिवस UN जागतिक वन्यजीव म्हणून घोषित केले. जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतींबद्दल जागरुकता साजरी करण्याचा दिवस असतो. यूएनजीएच्या ठरावाने CITES सचिवालयाला युएनए कॅलेंडरवर वन्यजीवांसाठीच्या या विशेष दिवसाच्या जागतिक पाळण्यासाठी सुत्रधार म्हणून नियुक्त केले आहे. जागतिक वन्यजीव दिन हा आता वन्यजीवांना समर्पित सर्वात महत्वाचा जागतिक वार्षिक कार्यक्रम बनला आहे.