महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी राजकीय

जनतेने दोन वेळा संधी दिली तिसऱ्यांदा रस्त्यावर आणले सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांना टोला

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना पक्षाने आता तिसऱ्यांदा संधी दिली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र अपक्ष उमेदवाराच्या एन्ट्रीने या निवडणुकीला वेगळेच वळण आले आहे. महाविकास आघाडीने सुरेश म्हात्रे ऊर्फ (बाळ्यामामा) यांना तर महायुतीने कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे रिंगणात उतरले आहे.

भिवंडी, कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित पत्रकार परिषद कल्याण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना टोला लगावला. ते म्हणाले “2014 ची आणि 2019 च्या निवडणुकीला कपिल पाटील कधी कुठल्या बिल्डिंगमध्ये, कुठल्या मोहल्ल्यात प्रचाराला गेले तरी होते का? 2014 व 2019 निवडणूकीच्या वेळी कपिल पाटील कोणत्याही ठिकाणी प्रचाराला गेले नव्हते. आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसत आहेत याचे सगळे श्रेय मतदारांचे आहे. कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेला त्यांना रस्त्यावर आणलेले आहे.” अशी टीका बाळ्यामामांनी कपिल पाटलांवर केली आहे.

Translate »
×