Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
इतर चर्चेची बातमी

डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/vTCHJOvq7mk?si=kGCbTtH4EgdZ8mlM

कल्याण/प्रतिनिधी – सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस असून अनेक नागरिकांना उष्माच्या त्रासाने प्रवास करुन आल्यानंतर जिने चढून प्रवास करणे शक्य होत नाही. सामानाची वाहतूक करणारे प्रवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र बहुतांश दिवस हे सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सामान्य माणसाला या सुविधांपासून वंचित राहावे लागणार असेल तर अशा कामांवर लाखों रुपये खर्च करून काय उपयोग? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले. मात्र महिन्यातील काहीच दिवस सोडले तर इतर दिवशी हे सरकते जिने बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. काहीच पर्याय नसल्याने प्रवाशांना जिन्यावरून चालत जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष लवकरात लववर सरकता जिना सुरू करावा अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. 

Translate »
X