नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – आदिवासी भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीने 71 वा विमुक्त दिन व 75 वा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित शासन लक्षवेधी निळा सत्याग्रह या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यातील आदिवासी, पारधी, तडवी ,बिल, काटुनी, अंध, ठाकर इत्यादी जमातींना केंद्राचा ट्रायबल सब प्लांटमध्ये समाविष्ट असलेल्या बजेट मिळत नाही, राज्य सरकार या ओटीएसपी मध्ये मोडणाऱ्या जमातीसाठी भरीव बजेट देत नाही त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या समूहाला विकास करता आला नाही.
राज्यातील सर्वच विभागात मूळ आदिवासी व भटक्या विमुक्त बेचाळीस जमातींच्या हजारो कुटुंबांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. मोठ मोठ्या शहरालगतच्या परिसरात भटक्या जमातीचे शेकडो कुटुंब असुरक्षित जीवन जगतात. या जमातींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी 2011 मध्ये जनशताब्दी वर्षानिमित्त योजना सुरू केली होती. परंतु महसूल व सामाजिक न्याय प्रशासनाला नाकारते पणामुळे जमीन व लाभधारक उपलब्ध असूनही योजना राबवली गेली नाही.