प्रतिनिधी.
कल्याण – मुलाच्या हौशिखातर किंवा अनेकदा अंधश्रद्धेतून घरात कासव, पोपट यासारखे प्राणी पाळले जातात. नैसर्गिक अधिवासात राहणारे हे प्राणी पाळणे कायद्याने गुन्हा असतानाही कधी कायद्याच्या अज्ञाना मुळे तर कधी कायदा धाब्यावर बसवत या प्राणी पक्षाची खरेदी करत प्राणी पक्षी पाळले जातात. मात्र अशा नागरिकांना आता दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कल्याणच्या घोलपनगर अनुपमनगर परिसरात काही लोकांनी पोपट, व्होला आणि कासव यासारखे प्राणी पक्षी पाळल्याची माहिती मिळाल्या नंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परीक्षा परिसर पिंजून काढत पाळलेले पोपट ,कासव हस्तगत केले .दरम्यान हे पशु पक्षी पाळणाऱ्या नागरिकांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून हे पशु पक्षी जप्त करत त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले असून या सर्व पोपटावर औषधोपचार करत त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.