नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह भ प सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील तरण तलावात भरविण्यात आलेल्या १५ व्या प्यारा स्विमिंग चॅम्पियन शिप स्पर्धेत ११० दिव्याग खेळाडूनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे दरम्यान दिव्यांग खेळाडूंमधील विषेश कौशल्य दिसून आले.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धामध्ये दिव्यांग खेळाडूची निवड व्हावी यासाठी या खेळाडूना प्रशिक्षण देत त्यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र ही संस्था कार्यरत असून, आजवर अनेक खेळाडूसाठी ही संस्था यशाचे शिखर गाठणारी पायरी ठरली आहे.
दरम्यान या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या आमदार गायकवाड यांनी यासारख्या स्पर्धांचे आयोजन करत दिव्यांग मुलांना प्रोत्साहन देत त्यांच्यातील गुणाची पारख करणाऱ्या संस्थेचे आभार मानले. तर अशा स्पर्धाना मदत करत त्याना प्रोत्साहन देत असलो तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. खेळाडूना आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने खेळाडू मागे पडतात. पालिका प्रशासनाने खेळांसाठी अनेक भूखंड राखीव ठेवले असले तरी या भूखंडावर अनधिकृत बांधकामे झाल्याने खेळाडूच्या गरजा पूर्ण होत नाहीत यामुळे राजकीय लोकांनी पुढाकार घेत हे प्रश्न सोडविणे मैदानाच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवून खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
तर पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे यांनी स्पर्धांसाठी मैदाने उपलब्ध होत असली तरी सरावासाठी सुविधा मिळत नाहीत यामुळेच खेळाडू कडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन व्हावे यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी केली.
दरम्यान या स्पर्धेत सहभागी झालेल्या सिद्धी दळवी या खेळाडूने ५ प्रकारच्या जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. सिद्धी मागील ८ वर्षांपासून विविध कोचच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून कल्याण डोंबिवली क्षेत्रात ५० मीटर लांबीचे पूल उपलब्ध नाहीत मात्र स्पर्धेसाठी ५० मीटर लांबीचे पूल लागतात यामुळे खेळाडू मागे पडत असल्याने सरावासाठी ५० मित्र लांबीचे पूल उपलब्ध व्हावेत अशी मागणी केली.