नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/ प्रतिनिधी – कानून के हाथ बडे लम्बे होते है असा डायलॉग आपण अनेक चित्रपटा मध्ये ऐकला असेल पण त्याची प्रचिती पनवेल मधील १९९४ ला झालेल्या खुना मध्ये बघायला मिळाली आहे.
पनवेल मध्ये १९९४ ला एका इसमाचा खून झाला होता त्यात तीन आरोपी होते. त्यात एकाला अटक झाली होती पण ३० वर्षा नंतर ही यातील २ आरोपी फरार होते. शेवटी कानून के हाथ त्यांच्या पर्येत पोहचले आणि त्यातील एक आरोपलीला जरबंद करण्यात पोलिसांना यश आले यातील दुसरा आरोपी मयत झाला आहे.
३० वर्षापूर्वी खून करून फरार झालेले आरोपी अखेर पंजाब मध्ये जेरबंद झाला. हत्या करून गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांना चकवा देनारा आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. मूळ गावापासून दूर नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.
1994 साली मालकाला चुगली केल्यामुळे त्याने कामावरून काढल्याच्या संशयातून तिघांनी 38 वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
संशयित मुख्य आरोप्याला अटक देखील केली होती व उर्वरित आरोपी फरार होते व नाव बदलून मूळ गावापासून दूर राहत होते. यामध्ये एका आरोप्याचा मृत्यू झाला असून इतर एक आरोपी नाव बदलून पंजाब येथे गेल्या 30 वर्षांपासून राहत होता.अखेर गुप्त बातमीदारानी दिलेल्या माहितीनुसार पंजाब पोलिसांच्या सहकार्याने त्याला अटक केली गेली आहे.