नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पनवेल/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि काल दुपार पासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. पनवेल पालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचि अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू झालेली आहे. यासाठी संपूर्ण वॉर्ड ऑफीसर, वॉर्ड यंत्रणा कामाला लागलेली आहे. पालिकेची वेगवेगळी टीम तयार केली असून आतापर्यंत साडे चार हजार झेंडे संपूर्ण शहरातून 3200 छोटे मोठे बॅनर्स, आणि मोठे कटाऊस काढण्यात आले आहेत. अशी माहिती पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
तसेच ज्यांनी परवानगी घेतलेली नाही असे 2500 कटाऔट्स मोठ्या संख्येने काढलेले आहेत. हे काम आता 24 तास सुरू राहणार आहे. पुढच्या 24 तासात हे संपूर्ण शहर होल्डिंग मुक्त होणार आहे. पनवेल पालिका आयुक्त स्वतः रस्त्यावरून उतरून ही कारवाई करत आहे, जर कोणी परमिशन न घेता कोणी बॅनर बाजी केली तर आचारसंहितेच्या अनुषंगाने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.