नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगले तापले असून भाजप व शिंदे गटाकडून या निवडणुकीत एकनाथ खडसेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भाजप व शिंदे गटाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोबतच काँग्रेस व ठाकरे गटाला सोबत घेऊन महाविकास आघाडी पॅनल तयार केले असून या महाविकास आघाडी पॅनल ची पहिली बैठक एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
या बैठकीत महाविकास आघाडीचे आजी-माजी मंत्री आमदार यांची उपस्थिती होती. दरम्यान महाराष्ट्रात मंत्रीपदावर असताना देखील दूध संघाच्या सत्तेसाठी जिल्ह्यातील मंत्री लुलूप झाले असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटलांवर केली असून जिल्हा दूध संघाचे मतदार यांच्या प्रलोभनाला बळी पडणार नसल्याचा विश्वासही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.