कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अपर्ण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व असते. दरवर्षी कल्याणच्या शिवाजी चौकातून कोळी बांधव भगिनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत दुर्गाडी खाडीत समुद्राला नारळ अर्पण करतात .मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे मिरवणूक बंद असल्याने यंदा देखील कोळी महासंघाचे अध्यक्ष देवानंद भोईर याच्या हस्ते अतिशय सध्या पद्धतीने उत्सव साजरा करत कल्याण खाडीत नारळ अपर्ण करण्यात आला. यावेळी जगावर घोंघावणारे करोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालण्यात आले. यावेळी देवानंद भोईर यांनी नागरिकासाठी कोरोना लसीचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा, मागील काही दिवसात आलेल्या चक्रीवादळ आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोळी बांधवाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या कोळी बांधवांना नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली।
- August 22, 2021