नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
सोलापुर/प्रतिनिधी– आपल अंतिम उद्दिष्ट जाती निर्मूलन असलं पाहिजे, आज प्रत्येक समाजाला आरक्षणाची मागणी का करावी लागतीय? बाबासाहेबांनी सांगितलं होत की, 10 ते 25 वर्षात आरक्षणाची गरज पूर्ण झाली पाहिजे. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली नाही. सर्व नागरिकांना सर्व मूलभूत अधिकार देणं झालं नाही. शिक्षण आणि आरोग्य हे मोफत असलं पाहिजे. त्यासाठी १% सर्वात जास्त धनिकांवरती २% टॅक्स लावला पाहिजे. दरवर्षी सरकारी तिजोरीत साडेसात लाख कोटी जमा होतील. आणि वारसा संपत्ती वरती त्याच्यावर एकदाच ५०% टॅक्स लावला पाहिजे. साडे नऊ लाख कोटी रुपये जमा होतील. अस्तित्वाचे प्रश्न बाजूला करून अस्मितेचे प्रश्न उठवणं हा लोकशाहीचा खेळखंडोबा आहे.
म्हणून मराठाचं नव्हे तर ब्राम्हण, मुस्लिम समाज ही आरक्षण मागत आहे. दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आता आश्वासन दिलं आहे. कायद्याने मंजूर झालं तर त्याला अर्थ आहे. यासाठी मनोज जरांगे पाटलांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. आश्वासन हे आश्वासनचं असतं. मात्र, अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आंदोलनचं काम करत. असं मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी मेधा पाटकर यांनी सोलापुरात व्यक्त केले आहे.