नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे नाशिक दौऱ्यावर असून आज ते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला शहरासह 25 गावात स्वराज्य पक्ष शाखा फलकाचे उद्घाटन करत सायंकाळी लासलगाव बाजार समिती आवरता शेतकरी संघर्ष मेळावा घेणार असून स्वराज्य पक्ष शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा असा आमचा अजेंडा असल्याचे संभाजी राजे बोलत होते.
एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू असून दुसरीकडे संभाजी राजे हे स्वराज्य पक्ष शाखेचे ठीक ठिकाणी स्थापना करत असल्याने एक प्रकारे ओबीसी नेता छगन भुजबळ समोर मोठे आव्हान उभं राहणार असल्याचे चर्चेला उधाण आले आहे.