महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
थोडक्यात महाराष्ट्र

अन्न व्यवसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासना कडून कार्यशाळेचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे – अन्न व औषध प्रशासन व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अग्रिकल्चर (एमसीसीआयए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपहारगृह, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायिक, मिठाई, फरसाण, खाद्यतेल उत्पादक व दुध प्रकिया व्यवसायिकासाठी ‘फोर्टीफिकेशन, रिपर्पोज युज्ड कुकिंग ऑइल (आरयुसीओ) अभियान, सरप्लस फुड अँड हायजिन रेटींग’ याबाबत जागृती करण्यासाठी एमसीसीआयएच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, एमसीसीआयएच्या अन्न प्रकिया समितीचे अध्यक्ष आनंद बोरडीया, एफएसएसएआय पूर्व विभागाचे संचालक कर्नल दहीतुले आदी उपस्थित होते. यावेळी केएचपीटीचे जालिंदर शिंदे यांनी फोर्टीफिकेशनबाबत, सहायक आयुक्त श्री.देसाई यांनी आरयुसीओ तर अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी ‘हायजिन व सरप्लस फुड’ बाबत संगणकीय सादरीकरण करून मार्गदर्शन केले.

यापुढेही अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे देसाई यांनी सांगितले. व्यवसायिक प्रतिनिधी श्रीकृष्ण चितळे, रवी बुधानी, किशोर सरपोतदार यांनी उपस्थितीत केलेल्या शंकांचे प्रशासनाकडून निरसन करण्यात आले. यावेळी विविध व्यवसायिकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त सं. भा. नारगुडे, बा. म. ठाकुर, सी. ए. देसाई, श्री. रा. करकले, र.भि. कुलकर्णी, सु. श. क्षीरसागर, ग. पां. कोकणे, रा. र. काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी वि. अ. उनवणे. अ. ग. गायकवाड, सो. ह. इंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×