नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
छ. संभाजीनगर/प्रतिनिधी – आंब्याला फळांच्या राजाची उपमा दिली जाते. पण हा फक्त फळांचा राजा नही तर तो लोकांच्या जिभेवरही राज्य करतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आंब्याचा आस्वाद घेतात. त्यामुळेच संभाजीनगर मधील आंबा प्रेमींसाठी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाला शरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्याचबरोबर गोड, रसरशीत आणि चवदार आंब्याची चव चाखली. तसेच तृणधान्य महोत्सवालाही लोकांनी प्रेम दिले.
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, छ.संभाजी नगर महाकेशर आंबा बागायतदार संघ, मँगो बोअर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा तसेच मिलेट्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात मराठवाड्यातील केशर आंबा, कोकणातील हापूस आंब्याचा समावेश होता. आंबा आणि मिलेट्स महोत्सवाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आंबा महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांचा आंबा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा होता. त्याचबरोबर विविध जातीमधील आंब्याविषयी माहिती देण्यात आली. मिलेट्स हेल्दी फुड्स यांच्या वतीने तृणधान्याविषयी माहिती देण्यात आली. तृणधान्य हे पौष्टिक असून आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे स्थान फार महत्वाचे आहे. असे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांनी सांगितले. तसेच त्यांनी शहरातील नागरिकांना आंबा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.