Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी

महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणांकडून शुक्रवार ११ मार्च पासून उपविभागीय स्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण ग्रामीण विभागातील शहापूर आणि मुरबाड उपविभाग तसेच पालघर विभागातील पालघर, बोईसर ग्रामीण व एमआयडीसी, डहाणू, जव्हार, मोखाडा, सफाळे, तलासरी, विक्रमगड या उपविभागीय कार्यालयांमध्ये शुक्रवारी ११ मार्च सकाळी १० वाजता शिबिर होणार आहे. तर वसई पूर्व व पश्चिम, वसई नागरी व वाडा उपविभाग कार्यालयांमध्ये १४ मार्च तर विरार पूर्व व पश्चिम, नालासोपारा पूर्व व पश्चिम, आचोळे उपविभाग कार्यालयांमध्ये १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मिटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. तसेच कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे. या शिबिरांचा लाभ घेत कृषीसह इतर ग्राहकांनी आपली वीजबिले तात्काळ दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X