ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (ठाणे शहर विभाग) च्या वतीने “जागर परंपरेचा…उत्सव मंगळा गौरीचा” या संकल्पनेखाली महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनखाली ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते . जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र ही संस्था शिक्षण , आरोग्य , रोजगार , शेती आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर काम करत आहे . मेहंदी क्लासेस , ब्युटी पार्लर क्लासेस , घरघंटी वाटप, शिलाई मशीन वाटप यांसारख्या माध्यमातून संस्था स्वयंरोजगारासाठी देखील सहकार्य करत असते , महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत महिलांनी एकत्र यावे , विचारांची देवाण घेवाण व्हावी , त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणीत व्हावा , तसेच रोजच्या कामच्या धावपळीतून गृहिणी असलेल्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना क्षणभर विरंगुळा मिळावा आणि आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती परंपरेचा जागर व्हावा या हेतूने जागर परंपरेचा…उत्सव मंगळा गौरीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता .
ठाण्यातील महिलांचे ६५ गट या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी दुपारी ३ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री १ वाजेपर्यंत चालला. शेवटपर्यंत महिलांनी प्रेक्षागृह न सोडता जिजाऊच्या ‘जागर परंपरेचा …उत्सव मंगळागौरीचा’ मनमुराद आनंद लुटला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम इशा डे, चेतना भट यांनी लोकगीत गात महिलांना ताल धरायला लावला. तर ‘राणी मी होणार’ संचिता कुलकर्णी व सिद्धार्थ खिरीड यांनी व्यासपीठावर महिलांना बोलवून त्यांच्यासोबत विविध प्रकारच्या खेळांचं सादरीकरण केलं. लहान मुलींपासून तरुण व ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी या सोहळयाचा आनंद लुटला.
ठामपाचे मा. महापौर नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थित लावत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील महिलांची गर्दी पाहून जिजाऊचं ठाण्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्य किती मोठं आहे आणि ते दिवसेंदिवस अधिक वाढत असून ठाण्याची नवी पिढी घडविण्याचं काम जिजाऊ करत असल्याचे कौतूकोद्गार नरेश म्हस्के यांनी काढत निलेश सांबरे यांच्या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतूक करत निलेश सांबरे यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, चेतना भट, इशा डे तसेच ‘राणी मी होणार’ संचिता कुलकर्णी व सिद्धार्थ खिरीड यांनी सहभागी होत सर्व रसिकांना खळखळून हसवलं. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अभिनेते – निवेदक संतोष लिंबोरे पाटील आणि परेश कारंडे यांनी खुमासदार पद्धतीने पाहुणे आणि रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘लॉली’ म्हणजेच नम्रता संभेराव यांनी दोन तास थांबून महिलांच्या वेगवेगळया खेळांचे विशेष कौतुक केले. शेवटी जाताना एक मोठा उखाणा घेत महिलांसोबत फुगडी खेळत सामुहिक नृत्य सादर आणि ‘लॉली’च परफॉर्म करून आगरी-कोळी शैलीत रसिकांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट परफॉर्म करणार्या महिला गटांना पारितोषिक वितरण करून रात्री उशिरापर्यंत थांबलेल्या महिलांना रिक्षा व इतर वाहनांनी त्यांच्या घरी सुखरूप सोडण्यासाठीही जिजाऊच्या टीमने व्यवस्था केली.
यावेळी जिजाऊ अध्यक्ष निलेश सांबरे, भावनादेवी भगवान सांबरे, उद्योजक हेमंत भानुशाली , उद्योजक गोविंदू शेठ , हेमांगीताई पाटील, मोनिकाताई पानवे, उद्योजक धिरज सांबरे, ठाणे शहर सचिव केदार चव्हाण, महाराष्ट्र युवती अध्यक्ष किर्ती भोईर, मा. नगरसेविका विमलताई भोईर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ठाण्यातील जिजाऊच्या टीमचे परेश कारंडे, विपुल वाक्चौरे, आरती भोसले, ज्योत्स्ना हांडे, अनघा जाधव, नम्रता पाटील, मोहिनी भारमल, दर्शन भोसले, जतीन देठे, कार्तीक गायकवाड, ओमकार पाटकर, आदींसह मेडीकल युनिट, मेहंदी क्लास व अभ्यासिकांच्या शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमात पहिले पारितोषिक नृत्यरेखा ग्रुप २५००० हजार रुपये, दुसरे पारितोषिक शिवाई विद्या प्रसारक मंडळ १५००० रुपये , तिसरे दुसरे पारितोषिक रुचिरा ग्रुप यांना १०००० रुपये असे पारितोषिक वितरण करण्यात आले. तर राजमुद्रा ग्रुप, हिरकणी ग्रुप, सांगली हिल, साई शृंगार, साक्षी ग्रुप, श्रावण क्वीन, समृद्धी ,अष्टभुजा ग्रुप , जय महाकाली ग्रुप , मर्दानी ग्रुप, या १० ग्रुपला प्रत्येकी २००० रूपये तर कायारत्न ग्रुप, कन्यारत्न ग्रुप , पांचाली ग्रुप, नवदुर्गा ग्रुप , रहिवासी संघ महिला ग्रुप यांना प्रत्येकी ५००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर काही विशेष पारितोषिक देखील यावेळी देण्यात आली. एकंदरीतच कार्यक्रम हा खूपच रंगतदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.