महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

श्री क्षेत्र जेजुरी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष विषयी बहू माध्यम प्रदर्शनाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

पुणे/प्रतिनिधी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेत  आंतराष्टीय तृणधान्य वर्षे – 2023 या विषयांवर अधारीत भव्य बहूमाध्यम प्रदर्शानाचे आयोजन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी गड ता. पुरंदर(सासवड) जिल्हा पुणे  येथे दिनांक 24 ते 28 जानेवारी,2023 दरम्यान सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यत करण्यात येत आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे  केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या  वतीने करण्यात येत असून  या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहूमाध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा अत्यंत संक्षिप्त माहिती आणि बहूमाध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टीक वर्षे म्हणून घोषित केले आहे, या प्रदर्शनाच्या माध्यातून या तृणधाण्यातील पौष्टीक घटकांची माहिती सामान्य जनतेला मिळावी यासाठी ज्वारी, बाजरी, नाचनी, वरई,राळ राजगीरा आदी धाण्यांची माहिती या प्रदर्शनात दर्शविण्यात येणार आहे. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आजोजनही करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे. 

या प्रदर्शनात जनतेला माहिती देण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेत माहिती देण्यासाठी विविध बहूमाध्यमांचा वापर करण्यात आला आहे. यात बॅकलीट पॅनल्स्, एलइजी वॉल, प्रदर्शनी पॅनल्स, लघू चित्रपट आदी माध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे.
या प्रदर्शनाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद, पुणे यांच्या विविध विभागांद्वारे शासनाच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी स्टाल्स उभारण्यात येणार आहेत.

या प्रदशनाच्या उद्घाटन प्रसंगी, श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, माहिती प्रसारण मंत्रालयाचे,  केंद्रीय संचार ब्यूरो, पत्र सूचना कार्यालय, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा परिषद पुणे, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पुरंदर( सासवड), , जिल्हा माहिती कार्यालय, पुणे नगर परिषद, जेजुरी आदी कार्यालयांचे चे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत 

या बहूमाध्यम  प्रदर्शनास  भाविकांनी  भेटी द्याव्यात, असे आवाहन  केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×