WWW.nationnewsmarathi.com
मुंबई/प्रतिनिधी – मुंबईच्या वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून माझी वसुंधरा पुष्पोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २७ वर्षांपासून महापालिकेतर्फे तरुण पिढीला नवा संदेश देण्यासाठी नवे नवे उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या उपक्रमातून वृक्षांचे महत्त्व, वृक्षांचे प्रकार नेमके काय, किती प्रकारचे झाडे असतात, त्यांचे फायदे तसेच त्यांची पेरणी याची अधिकची माहिती देण्यासाठी कमीतकमी १० हजार विविध प्रकारच्या वनस्पतींच्या कुंड्या मांडण्यात आल्या आहेत आणि २०० प्रकारचे विविध देशी विदेशी झाडांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहेत.
त्याचबरोबर अनेक आयुर्वेदिक झाडे, विविध फळांची झाडे, विविध फुलांची झाडे, बांबू, कॅक्टस, कोरफड इत्यादी झाडांचा यात समावेश आहे. तसेच फुलांचा वापर करून अनेक प्राणी वाघ, सिंह, ससा, झेब्रा, हरिण, हत्ती त्याचबरोबर चांद्रयान ३ चे देखावे तयार केले आहेत. मुंबईकरांकडे जिथे कुठे जागा असेल घरात बाल्कनीत शक्यता असतील तिथे झाडे लावावीत आणि मुंबईला अजून प्रफुल्लित करावे ज्यांकरून सर्वांना चांगला श्वास घेता येईल असे संदेश देण्याचे उद्दिष्ट घेऊन या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनाला पाहण्यासाठी अनेक नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.