महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी ठाणे

आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. बाबासाहेबांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.

१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नवी मुंबईतील रबाळे येथे मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. या जयंतीनिमीत्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणातून परिवर्तनाकडे, पर्यावरण संरक्षण आणि शंभर टक्के मतदानाचा संदेश देत ही रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो आंबेडकर अनुयायांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Translate »
×