नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – जिल्हा क्रीडा परिषद पुणे व धुळे जिल्हाधिकारी कार्यालय तथा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील गरुड मैदान येथे विभागीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाशिक विभागातून आठ 19 वर्षीय आतील आठ मुलांचे संघ व आठ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.
या वार्षिक शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे दि. 6 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. आज या स्पर्धेत विविध वयोगटातील मुलामुलींच्या खो खो स्पर्धा पार पडत आहे. या खो-खो स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलींच्या व मुलांच्या विजेता संघांची पुढील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा महासंघाचे सचिव तथा राष्ट्रीय खो खो खेळाडू हेमंत भदाणे यांनी यावेळी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी, एम के पाटील, क्रीडा महासंघाचे कार्याध्यक्ष जितेंद्र चोटिया, सत्यजित सिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ क्रीडा शिक्षक यु.पी वाणी सर, रविकर बागुल, संदीप बाविस्कर, मनोहर चौधरी, गुरुदत्त चव्हाण, पंढरीनाथ बडगुजर या सर्वांच्या प्रयत्नाने ह्या क्रीडा स्पर्धा पार पडत असल्याची माहिती हेमंत भदाणे यांनी यावेळी दिली.