Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image कृषी चर्चेची बातमी

राष्ट्रीय पोषण बाग उपक्रमाअंतर्गत उमेदच्या महिलानी फुलवली सेंद्रीय शेती

नेशन न्युज मराठी टिम.

https://youtu.be/DlGi0_F8RpY

बीड – केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राज्यात महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान राबविण्यात येत असून बीड जिल्ह्यात राज्य सरकारच्या कृती संगम विभागाकडून राज्यात  पंधरा जून ते पंधरा जुलै २०२१ दरम्यान माझी पोषण बाग परस बाग मोहीम राबविण्यात आलीय. यातून उमेद च्या महिला बचत गटांनी कमी जागेत चौदा प्रकारचा सेंद्रिय भाजीपाल्याचे पीक घेतले असून यातून मुलांना आणि महिलांना सकस आणि रासायनिक मुक्त भाजीपाला खायला मिळत असल्याने निरोगी जीवन जगत आहेत.

बीड जिल्ह्यातील ममदापूर आणि मोरगाव येथील उमेदच्या बचत गटांतील महिलांनी अगदी कमी जागेत चौदा प्रकारच्या पालेभाज्यची सेंद्रिय शेती केली असून हा भाजीपाला बचत गटांतील महिलांना मोफत तर विक्री देखील केला जात आहे. यातून महिलांना चांगला नफा मिळत तर आहेच याच बरोबर त्यांचा बाजारात जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेची देखील बचत होत असल्याचं महिला सांगत आहेत.
सध्या बीड जिल्ह्यात नऊ हजार नऊशे तीन पोषण बागा तयार करण्यात आल्या असून यातील पाचशे पेक्षा अधिक पोषण बागा बचत गटांच्या महिलांनी उत्तम रित्या फुलवल्या आहेत. तर याच शेतीला त्या शेण खतापासून बनवलेला गांडूळ खत वापरत आहेत तर भाजीपल्यावर फवारणी करण्यासाठी निंबोळी अर्क,निमास्त्र, गोमूत्र वापरतात आणि गांडूळखतांच्या मधील जे पाणी बाहेर पडते ते पाणी फवारण्यासाठी वापरत आहोत.यामुळे हा भाजीपाला पूर्णतः सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे खायला रुचकर आणि चविष्ट लागतो .या अर्ध्या गुंठ्यांत चौदा प्रकारच्या पालेभाज्या आहेत यात पालक, मेथी, पत्ताकोबी, कोथिंबीर, वांगे, फ्लॉवर, भोपळा, पठाडी शेंग , पुदिना तर आहेच याच बरोबर औषधी वनस्पती देखील आहेत.
महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे आता ते वाढण्यासाठी मदत होत आहे.तर भाजीपाल्याचा फायदा कोविड काळात देखील झाला असून कुपोषण मुक्त महाराष्ट्र होण्यासाठी महिलानी पोषण बागेची निर्मिती केली आहे.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राज्यात महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान राबविण्यात येत असून बीड जिल्ह्यात राज्य सरकारच्या कृती संगम विभागाकडून राज्यात  पंधरा जून ते पंधरा जुलै २०२१ दरम्यान माझी पोषण बाग परस बाग मोहीम राबविण्यात आलीय.महिलांमध्ये असलेलं ऍनिमिया, गर्भाशय यासह विविध आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी नैसर्गिक रित्या पिकविलेला भाजीपाला खायला मिळावा आणि यातून महिलांची, मुलांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी पोषण बागेची निर्मिती करण्यात आली असून यासाठी बीड जिल्ह्यातील पाचशे पेक्षा अधिक उमेद च्या महिला बचत गटांनी कमी जागेत (अर्धा , कुणी दोन गुंठ्यांत) चौदा प्रकारचा सेंद्रिय भाजीपाल्याचे पीक घेतले आहे.यातून मुलांना आणि महिलांना सकस आणि रासायनिक मुक्त भाजीपाला खायला मिळत असल्याने निरोगी जीवन जगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X