मुंबई/प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिले.
भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत श्री. मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृत, दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा.
श्री.देशपांडे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात. मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक 7 भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.
श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, आगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे. याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहे; तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.
Related Posts
-
स्थानिक व स्वतंत्र पालकमंत्र्याच्या नेमणुकीची प्रहार जनशक्ती पक्षाकडून मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - जिल्ह्यातील नागरी…
-
मतदार नोंद जनजागृतीसाठी केडीएमसी व महाविदयालयाच्या प्रतिनिधिंची बैठक संपन्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार…
-
२२१ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यां २१ जूनला होणार प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 25 जिल्हा परिषदा…
-
९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला
प्रतिनिधी. मुंबई - विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाने दि.…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
राज्यातल्या आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी हुडकोकडून कर्ज
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास आश्रम शाळा आणि…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…
-
केडीएमसीच्या 'ह' व 'आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
१ ली ते ३ री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडचिरोली - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना खुश खबर
मुंबई /प्रतिनिधी - राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी…
-
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना…