मुंबई प्रतिनिधी– पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासन प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृध्द व आल्हाददायक अनुभव देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला एक शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.
या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथून, आपल्या सवडीनुसार हे ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. http://iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी व इंग्रजी भाषेत विविध पर्यटन विषयाच्या महत्त्वाच्या काही अभ्यासक्रमांसोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये असून परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या १ हजार उमेदवारांना पर्यटन संचालनालयामार्फत नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराचे किमान दहावी श्रेणी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
उमेदवारास ऑनलाईन प्रशिक्षण आणि परीक्षेनंतर इंटर्नशिपची संधी आणि वर्तन कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येईल. आयआयटीएफचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसाचे मूल्यांकन प्रशिक्षण घेतले जाईल आणि त्यानंतर “महाराष्ट्र पर्यटन परवानाकृत मार्गदर्शक” अशा स्वरूपात या उमेदवारास अंतिम प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळे (केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटनस्थळे वगळता) कोणत्याही पर्यटनस्थळांना सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर किंवा श्री. योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२-६२९४८८१७ वर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related Posts
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
एक हजार फुट व्हॅली क्रॉसिंग करून गिर्यारोहकांनी दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन…
-
कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, परीक्षेसाठी मिळणार एक संधी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा…
-
कल्याण-डोंबिवलीत एक हजार रिक्षांवर पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा
प्रतिनिधी. कल्याण - दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना
प्रतिनिधी. मुंबई - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास,एक झाड माणुसकीचं एक पाऊल परिवर्तनाचं
भिवंडी/प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - महात्मा गांधी रोजगार हमी…
-
‘अमृत’ संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यान कडून मुख्यमंत्री साहाय्याता निधीला एक लाख एक हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. या…
-
नवी मुंबईकर १ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छता…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज
मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी,महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू, अन्य मतदारसंघ दुर्लक्षित - आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसविले जमिनीवर
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
भारतातील वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचा पर्यटन विकास महामंडळासोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आयुर्वेद आणि इतर…