नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश सत्र २०२३ ची प्रक्रिया शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून प्रवेश अर्ज, प्रवेश पद्धती, नियमावली व प्रवेश वेळापत्रक https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थाळावर उपलब्ध राहतील. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा, असे आवाहन शहापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. ए. हिरे यांनी केले आहे.
प्रवेश अर्जाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास संचालनालयाच्या मदत कक्षास संकेतस्थळावर देण्यांत आलेल्या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा. या मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा.
संस्थेत उपलब्ध असलेले व्यवसाय व त्यांच्या उपलब्ध जागा कम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (शासकीय 38, आयएमसी – 10), फॅशन डिझाईन – (शासकीय 16, आयएमसी – 4), ड्रेस मेकिंग (शासकीय – 16, आयएमसी – 4), वेल्डर (शासकीय- 32, आयएमसी – ????, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (शासकीय – 16, आयएमसी – 4), वीजतंत्री (शासकीय 16 व आयएमसी 4), जोडारी (शासकीय – 16, आयएमसी – 4), मेकॅनिक मोटर व्हेईकल (शासकीय – 19, आयएमसी – 5), मशिनिष्ट (शासकीय – 16, आयएमसी – 4), टर्नर (शासकीय 16, आयएमसी – 4) अशा एकूण 252 जागा आहेत. अधिक माहितीसाठी 7397878476, 8149567118 येथे संपर्क साधावा.