नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
ठाणे/प्रतिनिधी - २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल,वंचित,शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांसाठी २५ टक्के ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे.विद्यार्थ्यांना १६ ते ३० एप्रिलपर्यंत ‘आरटीई’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण २ हजार ६१६ पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत.
या अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही,पण इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा आहे,त्या विद्यार्थ्याला तेथे प्रवेश घेता येणार आहे.परंतु,त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून खरोखरच त्या अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा आहे की नाही,याची खात्री केली जाणार आहे.
आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new.पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers),ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका,आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट–SC/ST/NT/VJ/OBC/SBC,दुर्बल गट-१ लाखापेक्षा कमी उत्पन्न,दिव्यांग बालकांचे ४०% अपंगत्व असल्यास)जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रकियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.