नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असतांना दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असतांना गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते.यावेळी कांदा निर्यातबंदी संदर्भात काही तरी घोषणा करीत याआपेक्षेने कांद्याचे दर 2 हजार रुपयांच्या जवळपास स्थिर होते मात्र काहीच घोषणा न झाल्याने आज कांद्याला 19 जूनच्या तुलनेत सात महिन्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निच्चांकी असे सतराशे रुपयांच्या आत 1675 रुपये इतके जास्तीतजास्त दर मिळाले आहे.
तरी सरासरी 1500 रुपये, कमीतकमी 600 रुपये इतके प्रति क्विंटलला दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली यामुळे कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जाते.