नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – कांदा बाजार भाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळामध्ये शासनाना वेठीस धरल्याने नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपन्या मार्फत लाल कांदा खरेदी सुरु झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आणि सर्व सदस्य हे आपापल्या मतदारसंघांमध्ये निघून गेले आणि सुरु असलेली नाफेडची कांद्याची खरेदी बंद करण्यात आली.
राज्यातील तसेच खास करून नाशिकच्या कांदा उत्पादकांची फसवणूक केली आहे. तसेच कांद्याच्या पिकांची ई -नोंद असेल तर 350 रुपये प्रतिक्विंटला अनुदान मिळेल. हे राज्य सरकारने जाहीर केले पाहिजे होते. यामुळे राज्य सरकार बाबत कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असे पिंपळगाव बसवंत येथे दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर