नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – विंचूर बाजार समिती पाठोपाठ आता लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या निफाड उपबाजार आवारामध्ये कांद्याचे लिलावास आज पासून पुन्हा सुरूवात झाली असून गेल्या बारा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरी येत्या गुरुवारी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे.
बाजार समिती बंद असताना विंचूर लासलगावच्या विंचूर उप बाजार समितीत कांदा आलेला आहे दोन ते तीन दिवसापासून सुरू असून कांद्याला जास्तीत जास्त २४०० सरासरी २१००,कमीत कमी ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. निफाड बाजार समिती ४५० वाहनाची आवक झाली. येत्या गुरुवारी देखील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मुख्य आवारात कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता कांद्याचा लिलाव बंद ठेवला आहे .मात्र यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना शेतकऱ्याच्या हिताकरीता विंचूर बाजार समितीने कांदा लिलाव सुरू ठेवले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असेल तरी देखील कांद्याला २००० ते २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी या मिळणाऱ्या भावात समाधानी नसून जर सर्व बाजार समिती सुरू असल्यास स्पर्धा होऊन ३००० हजार भाव मिळाला असता तरी सरकारने दखल घेऊन त्वरित बाजार समिती चालू करावी व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.