नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के दर वाढ केल्याचे पडसाद सर्वच कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या कांद्याच्या लिलावात दिसून येत आहे. तीन दिवसांपासून बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे लिलाव काल गुरुवारी सुरु झाले. मात्र, नाफेडचे प्रतिनिधी नसल्याने लिलाव बंद पाडण्यात आले होते. मात्र, शुक्रवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव पोलिसांच्या बंदोबस्तात सुरुवात करण्यात आले असून कांद्याला सरासरी 2150 भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सुमारास २१० वाहनातून कांद्याची आवक झाली. या कांद्याचा लिलाव पोलीस बंदोबस्तात सुरू असून कांद्याला सरासरी 2150 जास्तीत जास्त 2400 कमीत कमी 700 रुपये भाव मिळाला आहे. तरी नाफेडचे कोणतेही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला जवळपास 2200 रुपये भाव मिळाला असून त्या भावामध्ये शेतकरी समाधानी नसून नाफेडने खरेदी केला असता तर नक्कीच जास्त भाव मिळाला असता, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.