नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – केंद्राकडून कांद्याच्या ४० टक्के निर्यात दरवाढीचे परीणाम कांदे उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यावर झालेला आहे.नाशिक मध्ये देखील कृषी उत्पन्न समितीच्या कांदे विक्री संबंधी लिलावात या भाववाढीचा थेट परिणाम झालेला आहे. चांदवड येथे सलग कांद्याचे लिलाव तीन दिवसापासून बंद आहेत. कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीत संचालक मंडळाची बैठक घेतली गेली. त्यात जो पर्यंत मागण्या सरकार मान्य करत नाही. तोपर्यंत लिलावात भाग न घेण्यास ठाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी व्यापारी बांधवांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना टाळाटाळ केली. त्यानंतर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांना यासंदर्भात विचारणा केली असता. त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना संगितले की, बाजार समितीत काम करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना संचालक मंडळानी सांगितले की 26 तारखेची शासनाची बैठक होई पर्येंत आपण बाजार समिती काम करावे,परंतु यावर व्यापाऱ्यांनी सांगितले की आमच्या नाशिक जिल्हा आसोशियनने आपला परवाना जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार 64 व्यापाऱ्यांनी आपला परवाना बाजार समितीकडे जमा केला आहे.
त्याच प्रमाणे जाधव यांनी सांगितले की आम्ही व्यापाऱ्यांना विनंती करून देखील ती त्यांनी मान्य केली नाही. अखेर आम्ही नवीन कांदा व्यापाऱ्यांना परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नवीन व्यापाऱ्यांनी परवाना काढून कांद्याचा व्यापार सुरू करण्याचे आवाहन केले.